‘आधुनिक किसान’ची पुरस्कारप्राप्त वेबसाईट

औरंगाबादहून शेती आणि ग्रामविकासाचे ‘आधुनिक किसान’ हे साप्ताहिक सुरू झाले. ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव त्याचे संपादक आणि संचालकही आहेत. आधुनिक किसानला एक परिपूर्ण न्यूज पोर्टल आणि कृषी दैनिक असे ऑनलाईन स्वरूप द्यायचे होते. शेतकर्‍यांना बातम्या, घडामोडी, हवामान, ई-साप्ताहिक अशा अनेक गोष्टी समजाव्यात, त्यांना साप्ताहिकाशी संवाद साधता यावा. आपल्या समस्या वेबसाईटच्या माध्यमातूनच विचारता याव्यात अशी रचना या वेबसाईटची हवी होती. याशिवय कृषी आणि ग्रामविकासाच्या दृष्टीेने माहितीने परिपूर्ण असेही ते हवे होते. याशिवाय हीे वेबसाईट अत्याधुनिक, नव्या युगाची, आकर्षक स्वरूपाची आणि सहज समजेल अशीही हवी होती. या सर्व दृष्टींचा विचार करून आमचे प्रयत्न सुरू झाले.

साप्ताहिक, दैनिक आणि न्यूज पोर्टल असे तिहेरी स्वरूप देण्यासाठी म्हणून एका विशिष्ट डिझाईनची आवश्यकता होती. त्यावर बरेच काम केल्यानंतर सध्या असलेले आधुनिक किसानचे वेब डिझाईन वापरण्याचे निश्चित केले.

आधुनिक किसान हे एक बर्‍यापैकी विस्तार असलेले माध्यम असल्याने, त्यांच्या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या वेबसाईटवर दररोज किमान दोन हजार लोक तरी भेट देणार होते. त्यादृष्टीने बँडविड्थची निवड करणे गरजेचे होते. कारण अनलिमिटेड बँडविड्थ असेल तर तुमच्या वेबसाईटवर कितीही लोकांची भेटी दिल्या तरी त्याची फारशी काळजी करण्याची गरज नसते.

आधुनिक किसानचे जिल्हा, तालुकावार प्रतिनिधी असल्याने संबंधित प्रतिनिधींना त्या त्या ठिकाणाहून वेबसाईटमार्फत बातम्या अपडेट करण्याची सोयही या वेबसाईटमध्ये हवी होती. शिवाय मुख्य कार्यालयातील प्रतिनिधींनाही वेबसाईट दररोज अपडेट(दिवसातून किमान 4 ते 5 वेळा) अपडेटे करता येण्याची सोय त्यात हवी होती. या सगळ्या बारीक सारिक गोष्टी लक्षात घेऊन ‘कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टिमची’ सोय या वेबसाईटमध्ये करण्यात आली. त्यामुळे डिझाईन बदलण्यापासून ते बातम्या बदलण्यापर्यंतचे सर्व स्वातंत्र्य ‘आधुनिक किसान’ला मिळाले.

औरंगाबाद येथील प्रसिद्ध पंचतारांकित रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा राजकारण, उद्योग, कृषी आणि माध्यमांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनाच आधुनिक किसानची वेबसाईट खूप आवडली. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने 2011च्या मराठी वेबसाईटच्या पुरस्कारांमध्ये आधुनिक किसानच्या वेबसाईटची निवड केली. रचना, मांडणी आणि आशय या सर्वच बाबतीत आधुनिक किसानची वेबसाईट सरस ठरली तेव्हा आमच्या श्रमाचे खर्‍या अर्थाने सार्थक झाल्यासारखे वाटले.

आज या वेबसाईटने वर्ष पूर्ण केले असून गुगल अ‍ॅनॅलिटिक्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात जवळपास दोन लाखांपेक्षाही जास्त वाचकांनी आधुनिक किसानला भेट दिली आहे. विशेष म्हणजे अगदी मोजक्या पैशांत ही वेबसाईट आकाराला आली.

निशिकांत भालेराव यांना ‘चारठाणकर सेवागौरव’ पुरस्कार प्रदान

सेलू : सेलू येथील स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा सेवागौरव पुरस्काराने आधुनिक किसानचे संचालक संपादक श्री. निशिकांत भालेराव यांना नुकतेच (दिनांक ३० नोव्हेंबर) गौरविण्यात आले. सामाजिक व पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Read More

प्रयोगशील शेतकर्‍यांचा नांदरमध्ये सन्मान

औरंगाबाद, ता. १६ : विविध क्षेत्रातील लोकांना चांगल्या कामगिरीबद्दल पुरस्कार दिला जातो, मात्र अन्नधान्य पिकविणारा, शेतीतील प्रयोग करणारा शेतकरी त्यापासून वंचितच राहतो, त्याला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळत नाही. पैठण तालुक्यातील नांदर गावच्या निवडक प्रयोगशील शेतकरी या प्रकाराला अपवाद ठरले. आपल्या गावातील विविध प्रयोगशील शेतकर्‍यांच्या सन्मान आज नांदरच्या तरुणांनी केला. निमित्त होते येथे घेण्यात आलेल्या आधुनिक शेतकरी मेळाव्याचे.

Read More

पेप्सीच्या शीतपेयात आढळल्या मुंग्या

औरंगाबाद ता. ३१ : कोल्ड्रिंक बनविणार्‍या कंपन्या ग्राहकांच्या जीवाशी कसा खेळ करतात याचा पुन्हा औरंगाबाद येथे प्रत्यय आला असून पेप्सिको कंपनीच्या स्लाईस या शीतपेयाच्या सीलबंद बाटलीत चक्क मुंग्या आढळून आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Read More

‘आधुनिक किसान’ला चौथा स्तंभ पुरस्कार

मुंबई, दि.९ – बखरकारांमुळे जसा आपणास इतिहास कळला व त्यावर आपण विश्‍वास ठेवला तसेच पत्रकारांच्या बाबतीत आहे. पत्रकारांनी आपल्या बातम्यांमधून वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध करावी, कारण त्यांचे आजचे लिखाण हे उद्याची बखर ठरणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

Read More

माती परीक्षण उपक्रमाची उत्साहात सुरुवात

यंदाच्या रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ‘आधुनिक किसान’ आणि ‘इफको’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांसाठी फिरत्या वाहनाद्वारे मोफत माती परीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

Read More

आधुनिक किसान वेबसाईटला पुरस्कार प्रदान

मुंबई, ता. २८ : राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत साप्ताहिक आधुनिक किसानच्या संकेतस्थळाला तृतीय पुरस्कार मिळाला. त्याचे वितरण मुंबईमध्ये २७ नोव्हेंबर रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित समारंभात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक किसानच्या वतीने सहयोगी संपादक पंकज जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Read More

आधुनिक किसानच्या वर्धापनदिन अंकाचे शानदार प्रकाशन

नाशिक : येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी कृषी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून साप्ताहिक आधुनिक किसानच वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन येथील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Read More

जामखेडकरांना मिळणार कुकडीचे पाणी ?

अहमदनगर : दुष्काळामुळे जामखेड तालुक्यात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने कुकडीच्या आवर्तनामध्ये चौंडी व जवळा येथील बंधारे भरावेत या मागणीसाठी जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

Read More