कहाणी तुमची; शब्द आणि निर्मिती आमची

कहाणी तुमची; शब्द आणि निर्मिती आमची

अनेकदा व्यवसाय, उद्योग, नोकरी करत असताना आपण स्वत:बरोबरच समाजासाठी चांगलं काम करत असतो. डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यावसायिक, कलाकार, खेळाडू, राजकीय कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं चांगलं, समाजसेवी काम केलेलं असतं. पण बरेचदा ‘आपण भलं आणि आपलं काम भलं’ या वृत्तीमुळे ही कामं प्रकाशझोतात येत नाहीत. परिणामी आपल्याला ओळखणारे बरेच असतात, पण आपली प्रतिमा जी तयार व्हायला पाहिजे असते, तशी होत नाही.

परिणामी व्यावसायिक विस्तारात किंवा संबंधित कामात अडचणीत येतात. अनेकजण जनसंपर्क किंवा प्रतिमा निर्मितीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतात, पण हे माध्यम स्वभावताच थोडे उथळ असल्याने विस्तृत स्वरूपात त्यातून आपलं कामकाज, संघर्ष समाजापुढे उभा राहू शकत नाही.

पण आता तसे होणार नाही. आमच्या ‘मीडियाशिल्प’ माध्यमसंस्थेच्या माध्यमातून अशा आपल्यासारख्या प्रकाशझोतात न येणाºया मात्र तरीही विशेष असलेल्या व्यक्तिमत्वांची संघर्षमय गाथा, प्रवास आम्ही पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे योजिले आहे. यात आपल्या शिक्षणापासून ते तुमच्या क्षेत्रात यशस्वी होण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती रंजक आणि वाचनीय स्वरूपात तुमच्या छायाचित्रासह प्रसिद्ध होणार आहे.

तुम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल किंवा आपली यशकथा पुस्तकात प्रसिद्ध व्हावी असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. जनसंपर्काचा हा प्रकल्प सामूहिक आर्थिक सहकार्यातून साकारणार आहे.

पुस्तकात तुमची यशकथासंघर्षगाथा यावी अशी इच्छा असेल त्यासाठी पुढील गोष्टी करता येतील. 1. आपण दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा. 2. मीडियाशिल्पचे समन्वयक किंवा संपादिका आपल्याशी संवाद साधतील. 3. सुमारे एक ते दीड तासांचा हा संवाद असेल, यात आपल्याला आपल्याशी संबंधित विविध प्रश्नावली विचारली जाईल, जसे की घरची स्थिती, शिक्षणाचा संघर्ष, इत्यादी. 4. आपला स्वत:चा आणि आपल्याशी संबंधित एक दोन छायाचित्र आपण ईमेलवर पाठवायचे आहेत. 5. सुरुवातीला निर्मिती सेवा मूल्य म्हणून आपणास प्रत्येकी 8500 रुपये आगाऊ द्यावे लागतील. मात्र पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर आपण दिलेल्या मूल्याइतकी पुस्तके आपणास मोफत दिली जातील. म्हणजेच आपण जमा केलेल्या पैशांचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळेल. त्यासंदर्भात आमचे समन्वयक आपल्याला माहिती देतीलच. 7. या प्रकल्पाचे सेवा शुल्क आॅनलाईन पद्धतीने आपण पुढे दिलेल्या खाते क्रमांकावर किंवा क्यूआर कोडवर जमा करू शकतात्. 8. याशिवाय आमच्याशी संबंधित विविध सोशल माध्यमांमध्येही आपली व पुस्तकाची माहिती प्रसिद्ध केली जाईल. 9. पुस्तकाच्या निर्मितीचा कालावधी लक्षात घेता पुस्तकांचा संच आपल्याकडे येण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागेल. 10. हा सामूहिक प्रकल्प असल्याने आपल्यासारख्या अनेक लोकांच्या यशकथा एकावेळी यात प्रसिद्ध होणार आहेत. मात्र आपल्याला जर आपल्या जीवनकार्यावर स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करायचे असेल, तर आपण आमच्याकडे तसा स्वतंत्र संपर्क साधावासंपर्क mediashilp@gmail.com

बँक खाते क्रमांक 

Pankaj P Joshi – Saving A/c no.- 50100218755420Bank: HDFC bank, Shalimar branch, Nashik IFSC code: HDFC0004885, UPI : 88888805041@ybl

About

मीडियाशिल्पबद्दल

नाशिकसह मुंबई, पुणे, दिल्ली, औरंगाबाद अशा शहरांतील मोठ्या माध्यमांतील विश्वासू आणि दर्जेदार पत्रकारितेच्या सुमारे 22 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही सुमारे दीड वर्षांपासून ‘मीडियाशिल्प’ उपक्रम सुरू केला आहे.ही प्रोप्रायटरी सल्लागार फर्म आहे. पुस्तकलेखन व निर्मिती, वेबसाईट निर्मिती, दैनिकांना सल्ला-सेवा, लेख निर्मिती, जनसंपर्क व प्रसिद्धी, पत्रकारिता प्रशिक्षण असे आमचे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत सुरू असतात. आतापर्यंत आमची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. दर्जेदार लिखाण आणि प्रामाणिकपणा ही आमची ओळख आहे.

mediashilp

Website:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *