मीडिया शिल्प हा मराठी माध्यमातील एक आगळा उपक्रम आहे. डिजिटल युगात समांतर माध्यम प्रचलित होत आहे. त्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली.
तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रतिमा समाजात चांगली असेल, तर व्यवसाय वृद्धी नक्कीच होते. सुयोग्य माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती करणे किंवा तिची वृद्धी करणे शक्य होते. त्यासाठी आत्मचरित्र, पुस्तक, यशकथा, लेख, ब्लॉग, समाजमाध्यमे यांचा प्रभावी वापर करावा लागतो. हिच बाब हेरून आम्ही ‘मीडियाशिल्प’ उपक्रमाची उभारणी केली आहे. राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी संबंधित सर्वांसाठी या उपक्रमाचा फायदेशीर उपयोग होऊ शकतो.
आमच्या सेवा :
१. पुस्तक लेखन
२. फिचर्स आणि लेख निर्मिती
३. वृत्तलेखन
४. जाहिरातीची कॉपी
५. भाषांतर
६. संपादन
७. मुद्रितशोधन
८.डॉक्युमेंटेशन
९. ब्लॉग लेखन
१०. वेबसाईटची निर्मिती
११. सोशल मीडिया प्रचार प्रसार
१२. माध्यम प्रचार प्रसार धोरण सल्ला
१३. प्रतिमा निर्मिती
१४. समस्या व्यवस्थापन (क्रायसिस मॅनेजमेंट)
१५ माहिती विश्लेषण
संकल्पना :
पत्रकारिता आणि माध्यमे या क्षेत्रातील आमचा जवळपास २५ वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यामुळे बातमी, लेख, यशकथा, निबंध इत्यादींची लेखन करणे, संपादन करणे, भाषांतर करणे, आशयाची मांडणी/रचना करणे या गोष्टींमध्ये आम्ही तरबेज आहोतच. पण आम्हाला हेही माहीत आहे की या सर्वांना वेबसाईट, मोबाईल, टॅबलेट या नव्या माध्यमाची जोड देणे आजच्या काळात गरजेचे आहे.
त्यातूनच सुरेख, सुंदर, दर्जेदार अशा वेबसाईटची निर्मिती करण्याबाबत आम्हाला सुचले. यातून मग ‘वेबमाध्यम’ची कल्पना आकाराला आली. वेबमाध्यमाच्या यशस्वी प्रवासानंतर पुन्हा आशय आणि जनसंपर्क क्षेत्रात ‘माध्यमशिल्प’ द्वारे दमदार पाऊल टाकत आहोत.
संचालक
वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे, तर शोधपत्रकारितेतून बऱ्याच वाईट गोष्टींविरूद्ध त्यांनी लढा दिला आहे.
बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे. पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद यांसारखी कामेही त्यांनी केली असून त्यांची दोन अनुवादीत पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अशा या अनुभवी पत्रकार संचालिकेच्या नेतृत्वाखाली या संस्थेचे कामकाज चालणार आहे.
त्यामुळे वेबसाईट असो किंवा डॉक्युमेंटेशन त्यासाठी आमच्या या अनुभवाचा सर्वांना फायदाच होणार आहे. तसा तो व्हावा आणि मराठी वेबसाईट आणि डॉक्युमेंटेशन कामातील एक वेगळे पर्व सुरू व्हावे या उद्देशाने आम्ही ‘माध्यमशिल्प (mediashilp)च्या मार्गाने कार्यरत राहणार आहोत.