कोण आहोत आम्ही?

इंटरनेट जगताचा व्यापक विचार केला, तर आम्ही कोणीच नाही. पण तरीही चांगुलपणाचा, प्रामाणिकपणाचा अट्टाहास उराशी बाळगून ‘माध्यमशिल्प’च्या द्वारे तुमच्यासमोर आलो आहोत.

राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी आपल्यापैकी कुणी ना कुणी जोडलेले असणार. अनेकांच्या मनात व्यवसाय वाढीसाठी, संपर्क वाढीसाठी प्रयत्न करण्याचे असते.

यापैकी जे कुणी कलाकार, साहित्यिक असतात त्यांना आपल्या साहित्यासाठी, कलेसाठी स्वत:च्या हक्काचे असे आपले दालन असावेसे वाटते. अशा सर्व क्षेत्रातील लोकांची इच्छा ‘माध्यमशिल्पच्या’ माध्यमातून अगदी माफक खर्चात पूर्ण करता यावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.

मुळात पत्रकारिता आणि माध्यमे या क्षेत्रातील आमचा जवळपास पंधरा वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यामुळे बातमी, लेख, यशकथा, निबंध इत्यादींची लेखन करणे, संपादन करणे, भाषांतर करणे, आशयाची मांडणी/रचना करणे या गोष्टींमध्ये आम्ही तरबेज आहोतच. पण आम्हाला हेही माहीत आहे की या सर्वांना वेबसाईट, मोबाईल, टॅबलेट या नव्या माध्यमाची जोड देणे आजच्या काळात गरजेचे आहे.

त्यातूनच सुरेख, सुंदर, दर्जेदार अशा वेबसाईटची निर्मिती करण्याबाबत आम्हाला सुचले. मात्र हे काम स्वस्त, सर्वांना परडवडणारे असावे यावरही आम्ही ठाम होतो. त्यातूनच मग ‘वेबमाध्यम’ची कल्पना आकाराला आली. वेबमाध्यमाच्या यशस्वी प्रवासानंतर पुन्हा आशय आणि जनसंपर्क क्षेत्रात ‘माध्यमशिल्प’ द्वारे दमदार पाऊल टाकत आहोत.

वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे, तर शोधपत्रकारितेतून बर्‍याच वाईट गोष्टींविरूद्ध त्यांनी लढा दिला आहे.

बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे. पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद यांसारखी कामेही त्यांनी केली असून त्यांची दोन अनुवादीत पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अशा या अनुभवी पत्रकार संचालिकेच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेचे कामकाज चालणार आहे.

त्यामुळे वेबसाईट असो किंवा डॉक्युमेंटेशन त्यासाठी आमच्या या अनुभवाचा सर्वांना फायदाच होणार आहे. तसा तो व्हावा आणि मराठी वेबसाईट आणि डॉक्युमेंटेशन कामातील एक वेगळे पर्व सुरू व्हावे या उद्देशाने आम्ही ‘माध्यमशिल्प’च्या मार्गाने कार्यरत राहणार आहोत.