‘मीडियाशिल्प’ : दर्जा आणि विश्वासाची चार वर्षे

चार वर्ष झाली की ‘मीडियाशिल्प’ला. माध्यमांशी संबंधित अनेक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने दि. 1 जानेवारी 2019 ला ‘मीडियाशिल्प’ या प्रोप्रायटरी फर्मला आम्ही सुरूवात केली. स्वत:च्या आणि इतरांच्याही मनाला समाधान आणि आनंद देणारे दर्जेदार लेखन करता यावे हा त्या मागचा उद्देश. हा उपक्रम सुरू होऊन एक महिना व्हायच्या आतच आम्हाला पहिले काम मिळाले ते शेती आणि ग्रामविकासात कार्यरत असलेल्या सिन्नरच्या ‘युवा मित्र’ संस्थेच्या माहिती पत्रक निर्मितीचे.
तीन पानांच्या या पत्रकासाठी आम्ही एक संकेतस्थळ, दोन पुस्तके आणि इतर लेखन सामग्रीचा तब्बल तीन आठवडे अभ्यास करून लेखन केले होते. या कामातून ‘मीडियाशिल्प’चे पहिले मानधन मिळाले होते साडेतीन हजार रुपये. छापून आलेले ते माहितीपत्रक आणि त्यापोटी मिळालेले अल्पसं मानधन आम्हाला पुढच्या कामांसाठी खूपच बळ देऊन गेलं. मानधनापेक्षाही या स्वत:च्या कामात समाधान आणि निर्मितीचा आनंद प्रचंड होता.
त्यानंतर मग हळूहळू पुढची कामे मिळत गेली. आलेलं काम व्यवस्थित समजावून घेणे, त्याच्याशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करणे, आवश्यक ती माहिती गोळा करणे, लिखाणाचं पूर्व नियोजन करणे आणि नंतरच लिखाणाला अंतिम स्वरूप देणे या प्रक्रिया आमच्या कामाच्या भाग आणि वैशिष्ट्यही बनत गेल्या. नाशिकहून आम्ही हे काम पाहत असलो, तरी प्रत्यक्षात मुंबई, पुणे, औरंगाबाद, दिल्ली, खानदेश, विदर्भ याठिकाणचेच प्रकल्प ‘मीडियाशिल्प’कडे येत राहिले. सुरूवातीची दोन वर्षे गेल्यानंतर असं लक्षात आलं की काही ठिकाणी आता ‘मीडियाशिल्प’ची चर्चा होऊ लागली आहे. आमच्यासाठी ही बाब अभिमानाची आणि समाधानाची आहे.
आमच्या चार वर्षाच्या कठोर मेहनतीला आता हळूहळू फळं यायला लागली आहे. येणाºया काळात ‘मीडियाशिल्प’असंच दर्जेदार आणि आनंद देणारी, रिझल्ट देणारी कामे होत राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करूच. आगामी काळात आमच्या या ‘मीडियाशिल्प’च्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी असे आमचे स्वप्न आहे.
कोव्हिड साथीच्या काळात नुकत्याच सुरू झालेल्या ‘मीडियाशिल्प’च्या पुढे अडचणी आल्यात, पण आमचे आई-वडील, मित्र परिवार आणि काही हितचिंतक आमच्यामागे खंबीर उभे राहिले. त्यामुळे हा प्रवास सुकर होऊ शकला. हा प्रवास अनेक मित्र-हितचिंतकांच्या सदिच्छांचे फळ आहे. त्याचे श्रेय त्या सर्वांना जाते, ज्यांनी आमच्या ज्ञान आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून आम्हाला विविध प्रकल्प प्रदान केले, सुचविले. त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. त्या व्यक्ती-संस्था आणि आम्ही केलेल्या कामांचा तपशील माहितीसाठी पुढे देत आहोत. आपले प्रेम आमच्यावर पुढेही असेच राहिल या खात्रीसह.. कळावे,
आपले नम्र,
शिल्पा दातार जोशी, संस्थापक-संपादक,
पंकज प्र. जोशी, मुख्य समन्वयक
(1 जानेवारी 2023)
***
‘मीडियाशिल्प’ ने पुढील कामे केलीत…
पुस्तक लेखन, घोस्ट रायटींग, कॉपी रायटींग, मनोगत लेखन, संस्थेचा इतिहास आणि डॉक्युमेंटेशन, वृत्तपत्रीय लेख, वेबसाईट निर्मिती- एसईओ आणि एसएमओसह, डिजिटल वृत्त आणि फिचर्स लेखन, जाहिरात कॉपी लेखन, शब्दांकन आणि संकलन, डिजिटल प्रचार आणि प्रेस नोट, भाषांतर, टंकलेखन व मुद्रितशोधन, पॉलिटीकल स्ट्रॅटेजी, न्यूज वेबसाईट स्टॅटेजी, मासिक-नियतकालिकातील आशय नियोजन, इमेज बिल्डींग, ब्लॉग लेखन, वेब कंटेंट निर्मिती, वैद्यकीय पत्रकारिता अभ्यासक्रम लेखन, डिजिटल पत्रकारिता अभ्यासक्रम आराखडा निर्मिती (बी. व्होक, पुणे विद्यापीठ), डिजिटल पत्रकारिता विषयावर गेस्ट फॅकल्टी.
‘मीडियाशिल्प’शी संबंधित संस्था आणि व्यक्ती :
युवामित्र संस्था- सिन्नर, आपलं महानगर- मुंबई, अॅग्रोटेक मासिक-मुंबई, डॉ. अमोल अन्नदाते-वैजापूर, कृषी जागरण मासिक-नवी दिल्ली, जीवनउत्सव परिवार-नाशिक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्टÑ शासन – मुंबई,
पीआयबी-नाशिक, कारवी वाचनालय आणि नॅशनल बुक ट्रस्ट, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद- नाशिक, जिव्हाळा नियतकालिक, श्रीगुरूजी रुग्णालय -नाशिक, पत्रकारिता विभाग, एचपीटी कॉलेज- नाशिक, क्रेडाई-महाराष्टÑ,
माय क्लाऊड मॅगझीन, ज्ञान भाषा मराठी संस्था-मुंबई, कृषी पंढरी-औरंगाबाद, विश्वकर्मा प्रकाशन-पुणे, सारडा समूह, कॅमल हाऊस-नाशिक, बिलीफ फाऊंडेशन-पुणे, हरियाअली-शहादा, अक्षर मानव चळवळ-पुणे,
सोशल नेटवर्कींग फोरम, यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठ-नाशिक, भाजपा, आम आदमी पार्टी, नर्मदा बचाओ आंदोलन आणि श्रीमती मेधाताई पाटकर, दैनिक लोकमत आणि दैनिक दिव्य मराठी (-लेखमाला)
‘मीडियाशिल्प’ यांचा कायम ऋणी राहील…:
विनोद अपसिंगेकर, निशिकांत भालेराव, डॉ. वृन्दा भार्गवे, श्रीकांत नावरेकर, पराग मांदले, गौतम भटेवरा, सई बांदेकर, अमित आणि विक्रांत काजळे, अभय पुणतांबेकर,
गीतांजली चव्हाण, बिभीषण बागल, कै. सुनील पोटे, मनिषा पोटे, संजय सावंत, डॉ. अमोल अन्नदाते, विवेक गरूड, नरेंद्र पाटील, डॉ. डी. एल. कराड, मेधा पाटकर, राजन खान, डॉ. मंजुश्री ग्रामोपाध्ये, सुनील कोतवाल, सुचिकांत वनारसे, विवेक राजूरकर,
हेमंत (बाबा) शिंगणे, श्रीरंग सारडा, अॅड. मिलिंद चिंधडे, अॅड. नंदकिशोर भुतडा, सूरज मांढरे (जिल्हाधिकारी -नाशिक), दीपक चाटे (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक),
बिभीषण बागल, नितीन चौधरी, उमाशंकर मिश्र, मुक्ता नावरेकर, डॉ. श्रुती पानसे, मनोहर सोनवणे, मेघना ढोके, माधुरी पेठकर, वंदना धनेश्वर, नितीन फलटणकर, मनीषा पिंगळे, सतीश डोंगरे,
रवी अमृतकर, नरेंद्र शाळीग्राम, अभिजित कुलकर्णी, डॉ.अभिजित मुकादम, डॉ. अमोल कदम, दीप्ती राऊत, संदीप तापकीर, डॉ. गौरी रूमाले,
डॉ. अर्चना आणि शिवानंद तोंडे, सचिन मालेगावकर, विनोद रापतवार, किशोर कुळकर्णी, विकास पवार, नरेंद्र धारणे, गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, अमित घुगे, जितेंद्र भावे, वंदना अत्रे, दीपक जोशी, अपर्णा क्षेमकल्याणी, तनुजा जोशी आणि संदीप डांगे, स्मिता वाणी, तरन्नूम काद्री,
तैय्यब आणि नूह नुरानी, हैदरअली नुरानी, सुनील कडासने (आयपीएस), रोहिणी वाघ, मीनल केंगे, श्यामला चव्हाण आणि सई कावळे, प्रमोद गायकवाड, अपूर्वा जाखडी, स्वाती थोरात, डॉ. मनीषा जगताप, उत्तम कांबळे, शैलजा आरळकर, मंगल पगारे, डॉ. अशोक वासलवार, जनार्दन दांडगे, शिला बारसे यांच्यासह अनेक ज्ञान-अज्ञात मित्र, सहकारी व हितचिंतक